चित्रपटातले रोबोट आता फक्त काल्पनिक राहिलेले नाहीत.
हे व्हिडीओ मीम खूप समर्पक आहे... कारण करिअरची निवड करताना आता एका नव्या प्रश्नाचा विचार करावा लागतो...
फक्त "मला कोणती नोकरी करायची आहे?" एवढंच नाही, तर "त्या नोकरीतली कोणती कामं मशीन्स करतील?"
माणसांसारखे दिसणारे रोबोट्स आता कारखाने आणि गोदामांमध्ये काम करू लागले आहेत. तर दुसरीकडे, एआय सिस्टीम्सने आधीच लिखाण, कोडिंग, संशोधन आणि माहितीचे विश्लेषण यांसारखी कामं करायला सुरुवात केली आहे.
पण याचा अर्थ असा नाही की सगळ्याच नोकऱ्या संपुष्टात येतील.
कोणतीही नोकरी ही अनेक छोट्या-मोठ्या कामांची मिळून बनलेली असते, आणि तंत्रज्ञान ही सगळीच कामं एका झटक्यात स्वयंचलित करत नाही. ते सहसा आधी अशी कामं स्वतःहून करायला घेतं जी रोजची आणि रटाळवाणी असतात, आणि मग उरलेल्या कामांचं महत्त्व आपोआप बदलून जातं.
भविष्यात अशा लोकांना जास्त फायदा होईल, ज्यांना हे समजेल की तंत्रज्ञानावर कोणतं काम सोपवायचं, त्यांनी केलेल्या कामाची तपासणी कशी करायची, आणि जिथे तंत्रज्ञान कमी पडतं तिथे आपला स्वतःचा विचार कसा वापरायचा.
भविष्यात कामाच्या ठिकाणी माणसांची थेट मशिन्ससोबत स्पर्धा असेलच असं नाही.
तर ती स्पर्धा अशा दोन लोकांमध्ये असेल- ज्यांना एआयसोबत कसं काम करायचं हे माहीत आहे आणि दुसरे ते, जे एआयकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.
तुम्हाला काय वाटतं, तुमच्या सध्याच्या नोकरीतल्या कोणत्या कामात एआय किंवा रोबोटिक्स सर्वात आधी बदल घडवून आणतील?
(आधारित)
--- तुषार भ. कुटे
#AI #ArtificialIntelligence #Robots #Robotics #Automation #Jobs #Layoff
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com